शेतकऱ्यांना धान अनुदान वाटप सुरू, सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 20 हजार रुपये जमा

राज्यात सध्या दुष्काळ, अवकाळी, अतिवृष्टी या साऱ्या नैसर्गिक संकटांसह (Paddy Bonus) शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडले आहेत. शेती हा एकमेव उदरनिर्वाहाचा साधन असलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटे आणि शेतमालाला कमी भाव मिळणे यामुळे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिंदे सरकारने राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २०,००० रुपये एवढे बोनस देण्याचे जाहीर केले होते. ही बातमी ऐकून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

धान हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे पीक असून त्याची लागवड पावसाळ्यातील खरीप हंगामात होते. राज्यातील विदर्भ भाग धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक शेतकऱ्याला जास्तीत जास्त ४० हजार रुपयांपर्यंतचा हा बोनस मिळणार आहे. गोंदिया जिल्ह्यासारख्या प्रमुख धान उत्पादक भागातील पात्र शेतकऱ्यांना बोनसची रक्कम देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्यांनी सरकारच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केली होती, त्यांच्या बँक खात्यात हा बोनस जमा झाला आहे. गोंदिया जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ८१४ शेतकरी या बोनससाठी पात्र ठरले होते. त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २३५ कोटी ७६ लाख रुपयांचा बोनस जमा करण्यात आला आहे. उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच हा बोनस मिळेल.

गेल्या वर्षी प्रति शेतकरी १५ हजार रुपये बोनस देण्यात आला होता. मात्र यंदा ही रक्कम ५ हजार रुपयांनी वाढवून प्रति शेतकरी २० हजार रुपये बोनस देण्यात येत आहे. हा बोनस खरीप हंगाम सुरु होण्याआधी मिळाल्याने शेतकऱ्यांना पैशाचा मोठा आधार मिळाला आहे. या बोनसमुळे शेतीसाठी लागणारा खर्च करणे सोपे होईल.

Leave a Comment