या जिल्ह्यात नोव्हेंबर ते डिसेंबर २०२३ या कालावधीत राज्यातील अनेक भागांमध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. रब्बी हंगामातील पिके या अवकाळी पावसाच्या तडाख्यात आली होती. शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला होता. आता ज्या शेतकऱ्यांचे या अवकळी पवासमद्धे नुकसान झाले आहे अश्या शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे.
गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झालेले होते. गेल्या महिन्यात अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. धानाचे पिक पाण्यात बुडून गेले होते. शेतकऱ्यांनी मेहनत घेऊन लावलेले धान पिक कापणीपूर्वीच नष्ट झाले.
महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील ४२ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा लाभ मिळणार असून, ६९ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे. नुकसान भरपाईमुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.